जळगाव, प्रतिनिधी | इंडियन डेंटल असोसिएशन जिल्हा शाखा प्रेसिडेंटपदी डॉ. पुनम पाटील, सेक्रेटरीपदी नीलम किनगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हा डेंटल असोसिएशनच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा दोन वर्षांचा ठरलेला कार्यकाळ संपला. त्यामुळे नवीन कार्यकारणी निवडीसाठी जिल्हा डेंटल असोसिएशनची बुधवारी जळगाव येथे बैठक घेण्यात आली. इंडियन डेंटल असोसिएशन जिल्हा शाखेची धुरा प्रथमच महिला डॉक्टरांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीतया वेळी मावळते प्रेसिडेंट डॉ. ललीत चौधरी, सेक्रेटरी डॉ. मयूर जैन यांनी पदाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवीला. आतापर्यंतचा इतिहास पहाता प्रथमच संघटनेची जबाबदारी महिला डॉक्टरांकडे सोपिवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यात प्रेसिडेंट म्हणून डॉ. पुनम पाटील तर सेक्रेटरी म्हणून नीलम किनगे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर कार्यकारणीत डॉ. वर्षा चौधरी, उपाध्यक्ष डॉ. प्रियांका गांधी, डॉ. सिमरनकौर जुनेजा, डॉ. अंशिमा जैन, डॉ. सोनल पाटील, डॉ. प्रियंका भंसाली, डॉ. मेघना नारखेडे, डॉ. भाग्यश्री बडगुजर , डॉ. शीतल मंडोरा, खजिनदार, डॉ. गोल्डी चावला, डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी, डॉ. निकिता तलरेजा, डॉ. प्रीती बडाले, डॉ. नेहा अग्रवाल, डॉ. पुष्पा चौधरी, डॉ. माधुरी पाटील, डॉ. वैजयंती पाध्ये, डॉ. मेघना तोतला, यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या वेळी जिल्हाभरातील सर्व उपस्थीत डॉक्टरांनी नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.