Home क्राईम पाचोरा तालुक्यातील दोघंं एका वर्षासाठी हद्दपार

पाचोरा तालुक्यातील दोघंं एका वर्षासाठी हद्दपार

0
38

IMG 20180902 WA0035

पाचोरा (प्रतिनिधी ) पंकज उर्फ भोला संजय मोरे व योगेश शांतीलाल  पाटील  या दोघांना  जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातून एका वर्षासाठी उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी हद्दपरीचे आदेश दिले आहेत.

 

मुबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ)  (ब) मपोका अन्वये उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा राजेंद्र कचरे यांनी पाचोरा येथील रिलायन्स पेट्रोलपंप  शेजारी, भडगाव रोड येथील पंकज उर्फ भोला संजय मोरे   सोबतच पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी यागेश शांतीलाल पाटील  या दोघांना जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातून  १ वर्षासाठी  हद्दपारीची नोटीस बजावण्यात  आली आहे.  हे दोघे  जिल्हे सोडून  महाराष्ट्रात राहू शकतात. तसेच  तेथील जवळील पोलीस स्टेशनला त्यांनी महिन्यात एकदा त्याच्या राहण्याचे ठिकाणाची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्याबाहेर जाण्यापृर्वी १० दिवसाचे आत संबधित पोलीस स्टेशन माहिती देणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound