मुंबई प्रतिनिधी | आगामी काळात हा ‘ओमिक्रॉन’ विषाणू आणि रुग्णांमध्ये झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सध्या शाळा सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कुठेतरी सावरत असतांना दक्षिण आफ्रिकेत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूने जगाला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात हा विषाणू आणि रुग्णांमध्ये झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेत आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन झालेल्या चर्चेनुसार सध्या शाळा सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या व्हेरियंटबाबत चर्चा झाली असे सांगत शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय आरोग्य विभाग घेणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगितले. तेम्हणाले की, “या बैठकीत राज्यात सुरु असलेल्या माध्यमिक सोबतच 1 डिसेंबरपासून प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय होता. मात्र, कोरोनाच्या नव्या विषाणूने भीती निर्माण केल्यामुळे राज्य सरकराने नवी नियमावली जाहीर केली असून शाळा सुरू करायच्या की नाही, हा पेच निर्माण झाला आहे.”