साकळीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘हर घर दस्तक’ या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरीकास कोवीड१९चे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे साकळी येथील जिल्हा परिषदच्या उर्दु शाळेत आयोजन करण्यात आले होते.

साकळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले व किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामपंचायत कार्यालय ,जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले असुन या कोरोना प्रतिबंधक लसिकाणाच्या शिबिराचा गावातील नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेत आहे.

दरम्यान साकळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत दि.२६ लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील, ग्राम पंचायत सदस्य सय्यद अश्फाक सय्यद शौकत, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य नितीन फन्नाटे यांनी भेट दिली. आरोग्य विभागाच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराबाबत समाधान व्यक्त केले. या शिबिरामुळे साकळी गावातील उर्दु जिल्हा परिषदच्या शाळा परिसरातील रहिवाशी नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

Protected Content