महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक संपन्न…

मुंबई प्रतिनिधी | राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येऊन महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

यामध्ये जिल्हा परिषदेची सदस्य संख्या वाढवण्यासोबतच ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद आदी. निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिने अर्थात 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात चर्चा होऊन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2000 वरुन 2248 इतकी होईल. तर पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरुन 4496 इतकी होईल.

कोविडच्या ‘ओमीक्रॉन’ या विषाणुचा संसर्ग रोखण्यासंदर्भात चर्चा करण्यात झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची नियमित माहिती घेत त्यांच्यावर लक्ष ठेवल्यास संसर्गाला वेळीच रोखता येईल”असे सांगितले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल.

Protected Content