वरणगाव प्रतिनिधी | सिद्धेश्वर नगर पोलिस पंचायत, महिला दक्षता समिती, महाराष्ट्र रक्षक सेना गृप व वरणगाव पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वरणगाव सिद्धेश्वर नगर, वरणगाव येथे मुंबईत दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रध्दांजली व संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरणगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.आशीष अडसुल व इस्माईल शेख यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रदर्शन महिला दक्षता समिती व पोलिस पंचायत सदस्य सविता माळी यांनी केले
कार्यक्रमाला मानिनी फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्ष जयश्री इंगळे, अंगणवाडी सेविका पुष्पा सोनार, माधुरी मोरे, रेखा देशमुख, लक्ष्मी बैरागी, वैशाली सुरळकर, निलिमा झोपे, दगडू माळी,कीरण माळी, सरूबाई वाघमारे, कल्पना तायडे कलाबाई माळी, कस्तुराबाई माळी, पद्मा माळी , यशोदा कोळी आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सविता माळी यांनी केले.