फैजपूर कॉलेजमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधत रक्तदानं शिबीर संपन्न झालं. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी  जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे, एस के चौधरी, लिलाधर चौधरी, के.आर.चौधरी, एम टी फिरके, प्राचार्य डॉ..व्हि आर पाटील, प्राचार्य डॉ.आर एल चौधरी, उप प्राचार्य डॉ.आर वाय चौधरी केमिस्ट संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिरूध्द सरोदे उपस्थितीत होते.

रक्तदान शिबीरात ४७ विद्यार्थी व शिक्षकांनी रक्तदानं केले.रक्तदानं शिबीरासाठी प्रा. सचिन राणे, प्रा.महेश नेमाडे, प्रा. हेमंत पाटील, प्रा. पराग बाक्षे, प्रा.मयूर नारखेडे,प्रा. चेतन चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content