नाहाटा महाविद्यालयात आगळ्यावेगळ्या पद्धतीने संविधान दिन साजरा

भुसावळ प्रतिनिधी | माहिती-तंत्रज्ञानाचा मोठ्या कुशलतेने आणि कल्पकतेने उपयोग करत भुसावळ येथील पु. ओं नाहटा महाविद्यालयात संपूर्ण राज्यात चर्चेत येईल असा अभिनव पद्धतीने सविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

‘माझे संविधान माझा अभिमान’ विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार विधान माझा संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर आ.संजय सावकारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन फालक, संस्थेचे सचिव विष्णू चौधरी, प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे., उपप्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे, डॉ. एन. ई भंगाळे, डॉ.ए.डी गोस्वामी, उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे, शोभा तळेले आदींची उपस्थित होते.

माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात लाईव्ह प्रसारित करण्यात आला. ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे हे दवाखान्यात उपचार घेत असल्याने, त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुंबईवरून शिवसेनेच्या प्रवक्त्या आ.डॉ. मनीषा कायंदे, संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष आय ए एस खोब्रागडे, जिल्ह्याचे गुलाबराव पाटील, भारतीय निवडणूक आयोगाचे जगदीश मोरे यांनी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात सहभाग नोंदवून संवाद साधला. जळगाव जिल्ह्यातील आ.लताताई सोनवणे, आ. शिरिष चौधरी, आ.डॉ. बालाजी किणीकर, आ.किशोर आप्पा पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ. किशोर दराडे यांनी शुभेच्छा देऊन सहभाग नोंदवला.

महाराष्ट्रात हा कार्यक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘माझे संविधान माझा अभिमान’ उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी यांनी संविधानाची धून व्हाट्सअपवर स्टेटस म्हणून ठेवली. सगळ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम देशभक्ती जागृत केली. संविधानाविषयी अनोख्या पद्धतीने जाणीव जागृती केली. ही अभिनव कल्पना मांडून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन उपप्राचार्य उत्तम सुरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. प्रमुख अतिथींचे स्वागत संविधानाची प्रास्ताविका भेट देण्यात आली. संविधानाच्या सन्मानार्थ विविध स्लोगन याचा निनाद करून संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधानाचं वाचन प्रा शाम दुसाने यांनी केलं. आभार प्रा डॉ. नाडेकर यांनी मानले.

Protected Content