अंतुर्ली येथे कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव नुकताच संपन्न झाला. आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती.

 

मंदिर संस्थानने तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांना सपत्नीक पूजेचा मान देण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी यांनीही दर्शन घेतले. कृतिका नक्षत्राच्यानिमित्त हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी दोन दिवस खुले करण्यात आले होते. शुक्रवारी महिलांना दर्शनासाठी कार्तिक स्वामींचे मंदिर उघडण्यात आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेला हजेरी लावत.दर्शन घेत असतात.गावाशेजारीच बोरी नदी असून त्याच काठावर यात्रा भरवली जाते.सद्यस्थितीत अंतुर्ली येथील बोरी नदीवरील साठवण बंधारा विलोभनीय असा ओसंडून वाहत असल्याने यात्रेकाळात येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधले जात होते. दरम्यान दोन दिवस चालणारा कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव काळात सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे कार्तिक स्वामी मंदिर संस्थांन चे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

Protected Content