Home Cities जळगाव युवासेनेच्या राज्य सहसचिवपदी विराज कावडिया यांची नियुक्ती

युवासेनेच्या राज्य सहसचिवपदी विराज कावडिया यांची नियुक्ती

0
146

जळगाव प्रतिनिधी | युवासेनेच्या राज्य सहसचिवपदी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विराज कावडिया यांची युवासेनेच्या राज्य सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून वरूण सरदेसाई यांच्या हस्ते कावडिया यांना याचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

विराज कावडिया यांनी गत महापालिका निवडणूक शिवसेनेतर्फे लढविली होती. यात त्यांना अपयश आले होते. तर अलीकडेच्या त्यांना स्वीकृत नगरसेवकपद जाहीर करण्यात आले असून तांत्रिक अडचणींमुळे याच्या अधिकृत घोषणेत अडसर निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमिवर, कावडिया यांना युवासेनेत महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, विराज कावडिया यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे माजी मंत्री सुरेशदादा जैन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना वितरक कुणाल दराडे, अजिंक्य चुंभळे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील यांच्यासह शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकार्‍यांनी स्वागत केले आहे.


Protected Content

Play sound