पाचोरा, प्रतिनिधी| तालुक्यातील सामनेर येथील सर्पदंश झालेल्या एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी उघडकीला आली आहे. याबाबत सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील सामनेर येथील शेतकरी सुदर्शन पितांबर बडगुजर (चव्हाण)( वय – ४९) हे शेतात काम करताना त्याला सर्पदंश झाला होता. हि घटना ३० ऑक्टोबर रोजी लासगाव शिवारातील त्यांच्या शेतात घडली होती. त्यावर त्यांना लागलीच जळगाव येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना अचानक आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. या घटनेने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. मयत सुदर्शन हे पितांबर महादू बडगुजर यांचा मुलगा, डॉ. राजेंद्र चव्हाण यांचे बंधू तर योगेश व आकाश चव्हाण यांचे वडील होते.