दहिगाव येथे सामाजिक संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूचे वाटप

यावल, प्रतिनिधी| आदीवासी बांधवांची यंदाची दिवाळी आनंदात जावी यासाठी शिवशंभु व शिवस्मारक समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने तालुक्यातील दहीगाव येथील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप आज करण्यात आले.

देश हा गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. परिणामी बहुतांशांच्या घरात उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशात परिस्थिती कुठेतरी पुर्वपदावर येत आहे. त्यात दिवाळी सारखा मोठा सण असल्याने गरीबांनाही त्याचा आश्वाद घेता यावे म्हणून शिवशंभु व शिवस्मारक समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप आज तालुक्यातील दहीगाव येथील आदिवासी बांधवांना करण्यात आले. दरम्यान एक दिवा माणुसकीचा ह्या उपक्रमाव्दारे हि मदत सामाजिक संस्थेकडून करण्यात येत आहे. आदिवासींच्या पाडा नागदेवी वस्ती येथे जाऊन आदिवासी बांधवाना फराळ, मिठाई, खाऊ, फटाके आदींचे वाटप करून दिवाळी सण उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शिवशंभू संघटनेच्या युवती जिल्हाध्यक्षा कविता पाटील, दिव्या पाटील, शिवस्मारक समिती जळगांव जिल्हाध्यक्ष अल्पेश जैन , शिवस्मारक समिती महाराष्ट्र राज्य सचिव कोमल पाटील , छोटू जगताप, मयूर पाटील, जगदीश गायकवाड, रविंद्र पाटील, हितेश महाजन, सुजित पाटील, आकश जैन, निलेश पाटील, रितेश पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content