टाकरखेडा येथील डॉ. महेश महाजन नीटच्या सुपर स्पेशलिटी परिक्षेत देशात व्दितीय

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा येथील रहिवासी डॉ. महेश सुनील महाजन यांनी नुकत्याच पार पडलेल्या नीटच्या सुपर स्पेशलिटी परिक्षेत देशातुन दुसरा क्रमांक पटकाला आहे.

डॉ. महेश महाजन यांनी अत्यंत साधारण परिस्थितीत एमबीबीएसचे शिक्षण नायर रूग्णालय मुंबई येथे घेतले व त्यानंतर त्यांनी आंबेजोगाई कॉलेजला येथे न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसर्जन अशा पदवी संपादन केली. वैद्यकिय क्षेत्रात यु.जी. पी. जी. ते सुपर स्पेशलिटी या वैद्यकीय शिक्षणाच्या खडतर प्रवासातील सर्वोच्च अंतिम टप्प्यात ते पोहोचले. समाजातून त्यांनी एस. एस. डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असतांना निरुत्तर फाउंडेशन, टाटा मेमोरियल अशा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित संस्थांकडून त्यांना गुणवंतेच्या आधारावर लाखो रूपयांची शिष्यवृत्ती देखील मिळाली आहे. तेव्हा अशा प्रकारे नीटच्या परिक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल त्यांचे टाकरखेडा गावासह तालुक्यातुन अभिनंदन होत आहे. ते डॉ. महेश महाजन हे जीवन प्राधिकरण विभागात लिपिक सुनील रतन महाजन यांचे सुपूत्र तर टाकरखेडा येथील विकास रतन महाजन यांचे पुतणेे आहे.

Protected Content