अ‍ॅड.देवकांत पाटील व योगिता पाटील यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार

यावल, प्रतिनिधी | विरावली येथिल छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील व त्यांच्या सौभाग्यवती छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन सचिव तथा संजय गांधी समिती सदस्य योगिता देवकांत पाटील यांचा न्यू बचपन प्ले स्कूल व माळीज क्लासेसतर्फे त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कामाची दखल घेत सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

 

माळीज क्लासेस सभागृहात रविवार दि. २४ ऑक्टोबर रोजी आयोजित पुरस्कार सोहळ्यात अ‍ॅड.देवकांत पाटील व योगिता पाटील यांना सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुछ देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी माळीज क्लासेसचे संथापक अध्यक्ष कैलास माळी सर यांनी व त्यांच्या सहकारी संचालक मंडळ यांनी पाटील दाम्पत्याचा सत्कार केला. पाटील दाम्पत्याने सामाजिक , शैक्षणिक ,राजकीय कार्याची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन च्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम राबवीत असतात. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नवनवीन नावीन्य पूर्ण प्रयोग याची दखल घेत तसेच कोरोना काळात केलेली जनजागृती , मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा, स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन शिबिर , बेसिक संगणक शिबिर, कोरोना काळात राज्यस्तरीय महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त घेतलेली ऑनलाईन स्पर्धा, तसेच रक्त तपासणी शिबिर , रक्तदान शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, स्वछता विषयी जनजागृती, स्मशान भूमीत साफ सफाई अभियान राबवणे, नियमितपणे सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेणे, सामाजिक क्षेत्रात नेहमी सर्वांना मदत करत राहणे, राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक विषयांना हात घालत राहणे, जनहिताचे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गे लावण्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Protected Content