जय मल्हार गणेश मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर

फैजपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील खंडोबावाडी रोडवर जय मल्हार गणेश मित्र मंडळाच्यावतीने संजीवनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

शहरातील संजीवनी ब्लड बँकच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. जय मल्हार गणेश मित्र मंडळाने यावर्षी वीस फूट उंचीच्या गणेश मूर्तीची  स्थापना केली. या मंडळातर्फे दरवर्षी नवनवीन असे सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. शनिवारी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन केले होते. या महाप्रसादाचा लाभ तब्बल पंचवीस हजार नागरिकांनी घेतला.

 

जय मल्हार मित्र गणेश मित्र मंडळाचे  सर्वश्री युवा कार्यकर्ते हेमराज चौधरी, केतन भंगाळे , विशाल भारंबे, राकेश चौधरी, ललित नारखेडे, पियुष चौधरी, कुंदन बढे, अभिजित राणे, रुपेश नारखेडे, आकाश चौधरी, शुभम भिरुड, भूषण भिरुड, पियुष बेंडाळे, पराग माळी, धिरज नारखेडे, भूपेंद्र पाटील यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content