७ मागण्यासाठी महंत परमहंस यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी

अयोध्या: वृत्तसंस्था । तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी आपल्या जन्मदिनी इच्छामरणाची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात ७ मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास इच्छामरण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.

या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख केला आहे.

. लोकसंख्या नियंत्रण कायदा , समान नागरी कायदा, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे, मुलींना मोफत शिक्षण, गोवंशाला राष्ट्रीय वारसा जाहीर करणे., गावपातळीवर ग्रामप्रधानावर गोसेवेची जबाबदारी देणे, रामचरितमानस हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ घोषित करणे, प्रत्येक बेरोजगाराला योग्यतेनुसार नोकरी देऊन राष्ट्राला बेरोजगारीमुक्त करणे अशा या त्यांच्या ७ मागण्या आहेत .

या पूर्वी १२ ऑक्टोबरला महंत परमहंस दास यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. हे लक्षात घेत प्रशासनाने बळजबरीने त्यांचे उपोषण थांबवले होते. महंत परमहंस दास यांनी राम मंदिरासाठी देखील उपोषण केले होते.

तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी आता भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावे अशी मागणी गेल्याच महिन्यात केली होती. या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते. जो पर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपले उपोषण संपणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केलेली होती. देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झालेली नाही तर फाळणीचे कोणते औचित्यच नाही, असे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तान आणि बांगलादेशचे भारतात विलिनीकरण करून अखंड भारताची घोषणा केली पाहिजे, अशीही त्यांची मागणी होती

Protected Content