जय माता दी सोसायटीचे व्यवस्थापक, चेअरमन व सचिव यांची चौकशी करा : नाना पाटील (व्हिडिओ)

भुसावळ, प्रतिनिधी | जिल्हा बँक निवडणुकीत मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज ते जय माता दी पतसंस्थेचे कर्जदार असल्याचे दाखवून फेटाळण्यात आला. प्रत्यक्षात त्यांचा या पतपेढीशी कधीही संबंध नसतांना त्यांना कर्जदार असल्याचे दाखविण्याचा प्रकार हा गंभीर असल्याने नाना पाटील यांनी या प्रकरणी जय माता दी अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीचे व्यवस्थापक,चेअरमन व सचिव यांचे विरुद्ध आवश्यक ती सविस्तर चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दाखल केली आहे.

 

नाना पाटील यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०२१-२०२६ या कालावधीसाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याच मतदार संघातून एकनाथराव खडसे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जय मातादी अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटी लि. भुसावळ ता. भुसावळ जि. जळगाव या सोसायटीचा मी सभासद नव्हतो, मी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही व मी थकबाकीदार देखील नाही. मात्र मी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मी थकबाकीदार आहे असे कारण देऊन, माझा अर्ज बाद करण्यात आलेला आहे. सदरच्या माझ्या या अर्ज बाद करण्याच्या कामात जय मातादी अर्बन को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे व्यवस्थापक, चेअरमन विजय चौधरी (पूर्ण नाव माहित नाही) व सचिव यांनी संगनमताने खोटे कर्ज व थकबाकी दाखवून माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वरील लोकांनी माझा उमेदवारी अर्ज खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या गैरकृत्यांसंदर्भात माझी तक्रार असून वरील व्यक्तींविरुद्ध बाबत सविस्तर चौकशी करावी. माझ्या या तक्रारी संदर्भात गुन्ह्या संदर्भात त्वरित चौकशी करण्यात यावी, जय माता दी अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायाटीचे व्यवस्थापक,चेअरमन विजय चौधरी ( पूर्ण नाव माहित नाही )व सचिव यांचे विरुद्ध आवश्यक ती सविस्तर चौकशी करून कडक फौझदारी कारवाई करण्यात यावी व मला न्याय देण्यात यावा हि विनंती.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3005497809673800

 

Protected Content