Home Cities रावेर पालच्या बोरघाटात दोन वाहन धारकांमध्ये तुफान हाणामारी!

पालच्या बोरघाटात दोन वाहन धारकांमध्ये तुफान हाणामारी!


रावेर, प्रतिनिधी| वाहनांनी ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून तुफान हाणामारी झाल्याची घटना काल पालच्या बोरघाटात घडली. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता दोन्ही वाहन धारक हे पसार झालेले होते.

 

याबाबत वृत्त असे की, पाल येथील बोरघाटात रस्तालूट झाल्याची गुप्त माहिती सावदा व पाल पोलीस स्थानकाला शुक्रवार रोजी मिळाली. त्यावर सावदा पोलीस स्थानकाचे सपोनी इंगवले व पालचे फौजदार राजेंद्र राठोड घटनास्थळी धाव  घेतली. मात्र त्याठिकाणी रस्तालूट न होता दोन वाहन धारकांमध्ये तुफान हाणामारी झालेली होती. पोलीस सदर ठिकाण गाठताच दोन्ही वाहन धारक हे पसार झालेले होते. तत्पूर्वी दोघांनी आपसात तडजोड करून निघुन गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे  पोलिस प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली.

 


Protected Content

Play sound