किशोर पाटील यांना राजनंदिनी संस्थेतर्फे कृषिभूषण पुरस्कार

पारोळा प्रतिनिधी | तालुक्यातील जोगलखेडे येथील प्रगतशील शेतकरी व बाहुबली शेतकरी संघटनेचे पारोळा तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांना नुकतेच जळगाव येथे कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यता आले.

 

राजनंदिनी बहुद्देशीय संस्था जळगाव तसेच राजपूत करणी सेना जळगाव, जळगाव खान्देश कोणते मराठा वधू वर ग्रुप, गौरी उद्योग समूह वावडदा यांच्या सौजन्याने जीवन गौरव कृषिभूषण व कृषीमित्र पुरस्कार किड्स गुरुकुल स्कूल जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार मनिष जैन, प्रसिद्ध केळी तज्ञ के. बी. पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, राजपूत करणी सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील, सिंगल वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, खानदेश मराठा कुणबी वधु वर परिचय ग्रुपचे संस्थापक सुमित पाटील, किड्स गुरुकुल स्कूलचे संचालक आदेश ललवाणी. यावेळी माजी आमदार मनीष जैन यांनी शेतकरी सुखी तर जग सुखी असे गौरव उद्गार काढले. तर खासदार उन्मेष पाटील यांनी शेतकरी उद्योजक व्हावा व इतर शेतकऱ्यांना उद्योग देणारा तयार व्हावा. आधुनिक तंत्रज्ञान समाजोपयोगी करून हातात घालणाऱ्यांना साद दिली पाहिजे असे गौरवोद्गार काढले. राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष संदीप वाघ यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या कधीच करू नये, आत्महत्या हा पर्याय नसतो असे सूचक विधान दिले. तर कृषी उपसंचालक अनिल भोकरे शेतकरी यांच्या मधला दुवा असलेला कृषी विभाग व माझे शेतकरी हेच माझे कुटुंब असून शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत निश्चितच आपण पोहोचवू असे उद्गार काढले. यावेळी जिल्ह्यातून जीवनगौरव पुरस्कारासाठी शेतकरी उपस्थित होते. तर कृषी भूषण कृषी मित्र पुरस्कारासाठी प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

Protected Content