शेंदुर्णी येथील गरूड महाविद्यालयाच्या वसतीगृहात स्वतंत्र आयसोलेशन कक्ष

शेदुर्णी प्रतिनिधी । येथील गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या महिला वसतीगृह सर्व सोयीने सुसज्ज आहे. शेंदूर्णी नगरपंचायत प्रशासनास कोरोना विषाणू प्रादुर्भाव संशयित व परगावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन होण्यासाठी या इमारतीत आयसोलेशन कक्षासाठी निवड करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायतीने शेंदुर्णी सेकंडरी एज्यूकेशन संस्थेचे चेअरमन संजय गरूड यांच्या इमारतीत आयसोलेशन कक्षाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. महाविकास आघाडीच्या राज्य सरकारला मदत करण्यासाठी संस्था सदैव तयार असल्याचे सांगून क्वारंटाईन सेंटरसाठी महिला वसतिगृह इमारत तात्काळ नगरपंचायतीला देण्याचे मान्य केले. या इमारतीत आवश्यक सर्व सुविधा असून बेड व जेवण ह्या सुविधा नगरपंचायततर्फे पुरविल्या जाणार असल्याचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले. नगरपंचायतीकडून या आधी २ इमारती क्वारेंटाईन सेंटरसाठी निवडल्या होत्या. परंतु स्थानिक नागरिकांनी विरोध करून क्वारंटाईन सेंटर गावापासून लांब असावे म्हणून शेंदूर्णी नगरपंचायतला निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी गावापासून १ किलोमीटर अंतरावर क्वारेंटाईन सेंटर हलविले याबद्दल नागरिकांनी मुख्याधिकारी यांचे आभार मानले. आज गरुड महाविद्यालयाचे महिला वसतिगृहाची मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर.पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी व डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील, प्रा.डॉ. आर.डी.गवारे, आरोग्यसेवक अरूण जावळे, वसतिगृह सेवक शकील भाई हे उपस्थित होते.

Protected Content