Home Cities अमळनेर सेंट्रल बँकेतर्फे मारवड येथे कर्ज वाटप मेळावा

सेंट्रल बँकेतर्फे मारवड येथे कर्ज वाटप मेळावा

0
29

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील मारवड येथे सेंट्रल बँकेतर्फे कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात येवून बचत गटांना कर्ज मंजुरीच्या पत्रांचे वाटप करण्यात आले.

 

गुरुवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सेंट्रल बँक शाखा अमळनेर व मारवड यांच्यातर्फे मारवड विकासो आवारात कर्ज वाटप  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध योजनांतर्गत २ कोटी ६४ लाख रुपये कर्ज वाटप मंजुरीचे पत्र बचत गटांना देण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक अरुण प्रकाश, पंचायत समितीचे पंडित राठोड व पुरुषोत्तम बागुल, तसेच मारवड शाखा प्रबंधक विनोद साबळे, वैभव बुरांडे, कृषी वित्त अधिकारी दत्ता चव्हाण तसेच भगवान अहिरे, चेतन अहिरे बँक मित्र दीपक चौधरी, सचिन विंचूरकर, गजानन कोळी, बँक सखी वैशाली साळुंखे यांच्यासह बचत गटाच्या सदस्यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound