अमळनेरात पत्रकार व अधिकाऱ्यांसाठी लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील पत्रकार आणि पोलीस व महसुल कर्मचारी यांचे संयुक्त लसीकरण शिबीर वेब मीडिया असोसिएशन मुंबई शाखा अमळनेर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, वेब मीडिया असोसिएशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल, जिल्हाध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडीया, जिल्हा सचिव कमलेश वानखेडे, अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघ अध्यक्ष चेतन राजपुत, पत्रकार उमेश धनराळे, पत्रकार जयंतलाल वानखेडे, पत्रकार प्रा.विजय गाढे, डॉ. विलास पाटील, महेंद्र पाटील, नगर परिषदेचे संजय चौधरी, पोलीस नाईक, डॉ. शरद पाटील यांची लसीकरण व आरोग्य शिबीराला उपस्थिती लाभली.

या शिबिरात पत्रकार, पोलीस, महसुल कर्मचारी यांच्या रक्तदाब यासह विविध आजारांची तज्ज्ञ डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. सुमित सुर्यवंशी, डॉ. तुषार पाटील यांच्याकडून मोफत तपासणी करण्यात आली.  डॉ. विलास महाजन व सहकारी यांनी पत्रकार, पोलीस , महसुल कर्मचारी यांचे लसीकरण करून घेतले. यात नागरिकांना ही लसीकरणची सोय उपलब्ध करून दिले. तसेच गणेश लॅबचे अमोल शाह यांनी डायबेटिस तपासणीसाठी सेवा दिली.  प्रशासन व पत्रकार यांच्यातील निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. सदर शिबिरासाठी वेब मीडिया असोसिएशन अमळनेर तालुकाध्यक्ष समाधान मैराळे , उपाध्यक्ष नुरखा पठाण , तालुका सचिव सुरेश कांबळे, डॉ.युवराज पाटील, आबिद शेख, मनोज चित्ते, लक्ष्मीकांत सोनार सह सर्व वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तसेच आभार प्रा. विजय गाढे यांनी मानले.

Protected Content