अंदरपुरा येथे मुस्लिम बांधवांचा लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर,प्रतिनिधी  | शहरातील अंदरपुरा मोहल्ला येथे नुकतेच  आवास फाउंडेशनच्या वतीने लसीकरण अभियान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या  लसीकरण शिबिराचे उद्घाटन रुबी क्लिनिकचे डॉ. एजाज रंग्रेज यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात मुस्लिम बांधवांनी शेकडोंच्य संख्याने लसीकरण करून घेतले.  यात मुस्लिम महिलांनी सत्तर टक्के सहभागही होऊन समाजाला लसीकरण अभियानाचे एक चांगले संदेश या माध्यमातून दिले

 

शंभर टक्के लसीकरणाच्या उद्देशाने सरकारने कवचकुंडलची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अंदरपुरा मोहल्ला येथे आवास फाउंडेशनच्या माध्यमातून दि. १४ ऑक्टोबर रोजी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  याशिबिरात  ३५५ लोकांना लस देण्यात आली. यामध्ये ९८ टक्के मुस्लिम बांधवांची उपस्थितीत होती. नगरपरिषद दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन यांनी व त्यांची टीमने अनमोल सहकार्य केले. लसीकरण शिबिरात सुन्नी दारूल कज़ाचे अध्यक्ष फयाज पठाण कुरैशी, नगरसेवक ,नरेंद्र संदानशिव , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंकज चौधरी, अंदरपुरा मोहल्ला पंच कमिटीचे इकबाल शेख, मुबारक अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक, सामाजिक कार्यकर्ते गुलाम नबी पठाण, सईद शेख, लाईक खान, मनोज मोरे, अमजदअली शाह, इंजि. इम्रान कुरैशी आदिनी भेट दिली. लसीकरण सकाळी ९ ते संध्या ५ वाजेपर्यंत सुरू होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कर्मचारीच्या फाऊंडेशन तर्फे सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.  यशस्वीतेसाठी आवास फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक शेख, उपाध्यक्ष अहेमद अली सैय्यद, सचिव नविद शेख, मजहर शेख, जमाल शेख ,मुशीरोदीन मुल्लाजी, रियाज ठेकेदार, रौनक सर, मोहसीन सैय्यद, रिजवान शेख, शाकीर अली सैय्यद आदींनी कामकाज पहिले.

Protected Content