Home Cities भुसावळ सर्वांच्या सहकार्याने प्रचारात परतलो- खडसे ( व्हिडीओ )

सर्वांच्या सहकार्याने प्रचारात परतलो- खडसे ( व्हिडीओ )

0
40

भुसावळ प्रतिनिधी । आपण गत काही दिवसांपासून बाहेर असल्यामुळे विरोधकांनी अफवा पसरवल्या होत्या. मात्र सर्वांच्या सहकार्याने आपण परतलो असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी आज केले.

खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात नाथाभाऊ काय बोलणार याची उत्सुकता होती. मात्र मेळाव्याला उशीर झाल्यामुळे त्यांनी भाषण केले नाही. मात्र मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले की, गेल्या १७-१८ दिवसांपासून आपण उपचारासाठी बाहेर असतांना विरोधकांनी अनेक अफवा पसरवल्या. मात्र सर्व चाहत्यांच्या प्रेमाने आणि सहकार्याने आपण पुन्हा परतलो आहोत. कालच बोदवड येथे सभा झाली असून आता उर्वरित दिवसांमध्ये पूर्ण ताकदीने प्रचारात सहभागी होणार असल्याचे माहितीदेखील त्यांनी दिली.

पहा : एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound