धरणगावात शिवसेनेच्या पुढाकाराने लसीकरण मोहीम

धरणगाव, प्रतिनिधी | धरणगाव प्रभाग क्रमांक ४  शिंपी समाज मंगल कार्यालया शिवसेनेच्या पुढाकाराने  लसीकरण मोहीम घेण्यात आली.  या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

लसीकरण मोहिमेला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष निलेश आबा चौधरी , उपनगराध्यक्ष ,विलास महाजन,नगरसेवक भागवत चौधरी वासुदेव चौधरी,सुरेश महाजन, आरोग्य अधिकारी किरण पाटील, डॉ. मयुर जैन, सिस्टर मोरवकर, सोनवणे,सहकारी भदाने,महेंद्र महाजन बडगुजर आदी  आरोग्य विभाग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  या लसीकरण मोहिमेचे आयोजन  प्रभागचे नगरसेवक, गट नेता विनय पप्पू भावे, नगरसेविका अंजली भानुदास विसावे यांनी केले.  या मोहिमेत पहिला डोस ४९२ , दुसरा डोस  २२३  कोविड शिल्ड, आणि दुसरा डोस को व्हॅकसीन  ७८  येवढे डोसचे लसीकरण करण्यात आले.  लसीकरण मोहिमेत हिंदू मुस्लिम समाज बांधव यांनी पण लसीकरण करून घेतले.  यशस्वीतेसाठी सत्यनारायण चौक ,युवा सेना,पदाधिकारी, भगसिंह मित्र मंडळ , बडगुजर गल्ली शिवसेना, पदाधिकारी  सुदर्शन भागवत,मोहन मांडगे,किरण सोनवणे, अनिल बडगुजर, वासुदेव बडगुज, सचिन बडगुजर, खुशाल  मांडगे, सागर जगताप चेतन शिंपी राज जगताप, गणेश मराठे, मयूर बागुल, मंगेश सोनवणे, मनोज नेरपगार, हेमंत चौधरी, प्रशांत जगताप, जितेंद्र जगताप,  यांनी जनजागृती करून  यशस्वी कार्येक्रम केला,शिवसेना धरणगाव ने प्रभाग नुसार शंभर टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही पुढील  डोस साठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सह संपर्क प्रमुख  गुलाबराव वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांचा आणि आरोग्य विभागातील डॉ., नर्स, कर्मचारी यांचा सत्कार वार्डाचे नगरसेवक विनय भावे नगरसेविका अंजली विसावे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुदर्शन भागवत यांनी आभार मानले.

 

Protected Content