आयुषी बडगुजर मास्टर ऑफ इलेक्ट्रीकल शिक्षणासाठी कॅलिफोर्नियाला रवाना

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथील आयुषी बडगुजर ही मास्टर ऑफ इलेक्ट्रीकल या उच्च शिक्षणासाठी परदेशात कॅलिफोर्नियाला रवाना झाली आहे.

आयुषी बडगुजर ही  सिंहगड काॅलेज पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स मधुन बी.ई.चे पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन तीने पुढील शिक्षणासाठी San Jose state university California येथिल विद्यापीठात ती शिक्षण घेणार आहे. आयुषी हिने  कॅलिफोर्निया येथिल उच्च शिक्षणासाठी  विद्यापीठात  Masters in electrical engineering – Specialization in networking हा विषयाची निवड केली आहे. कु.आयुषी ही चोपडा येथिल राजेन्द्र वसंत बडगुजर व सौ.अनिता बडगुजर यांची कन्या तर चिंचोली येथील रहिवासी व सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असलेले अनिल बडगुजर व सौ.वंदना बडगुजर यांच्या होणा-या स्नुषा आहेत. आयुषी बडगुजर ही नुकतीच कॅलिफोर्निया येथे उच्च शिक्षणासाठी रवाना झाले बद्दल तीचे जिल्ह्यातील बडगुजर समाज बांधवांनी तसेच; अभिषेक बडगुजर; चिंचोली येथील लोकमान्य पिक सोसा.व्हाईस चेअरमन मधुकर बडगुजर;  सदाशिव बडगुजर;  नितिन बडगुजर;  शुभम बडगुजर;  श्रीराम बडगुजर;  जळगाव येथिल विवेक बडगुजर; कुणाल बडगुजर; सुहास बडगुजर ;  अंकुश बडगुजर; संजय बडगुजर; आदिनी अभिनंदन केले आहे.

Protected Content