पिंपळे आश्रम शाळेत व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

अमळनेर, प्रतिनिधी | जीवनात उंच शिखर गाठायचे असेल तर त्याग आणि मेहनत यांचे महत्वपूर्ण योगदान असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी केले.  ते पिंपळे आश्रम शाळेत व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनप्रसंगी बोलत होते.

 

श्री.चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी पिंपळे बुद्रुक ता. अमळनेर संचलित यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास  व्हावा या उद्देशाने संस्थेचे शैक्षणिक सल्लागार युवराज पाटील यांच्या कल्पनेतून व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. यात  इयत्ता आठवी ते बारावीच्या आदिवासीसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.   या  व्याख्यानामुळे आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार झाली. कार्यक्रमाचे आयोजन माध्यमिक शिक्षक गंगासागर वानखेडे  यांनी केले व सूत्रसंचालन  सतीश कागणे  यांनी केले. कार्यक्रमाला प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अविनाश अहिरे व माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक उदय पाटील, ज्येष्ठ शिक्षक प्रवीण पाटील , बोरसे सर, हेमंत पाटील , भटू वानखेडे,  स्वप्नील पाटील,  माधुरी पाटील,  रवींद्र धनगर, अधिक्षक प्रवीण पाटील व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.

Protected Content