Home Cities भुसावळ कुऱ्हा येथे महायुतीच्या प्रचारास प्रतिसाद

कुऱ्हा येथे महायुतीच्या प्रचारास प्रतिसाद


kurjha

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हा येथे भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना या महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा प्रचार करण्यात आला. यावेळी कुऱ्हा येथील गावातील नागरीक व महिलांशी संपर्क साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

याप्रसंगी आमदार संजयजी सावकारे, रावेर लोकसभा संयोजक व जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुकाध्यक्ष सुधाकरभाऊ जावळे, पं.स. सभापती प्रिती पाटील, जि.प. सदस्या पल्लवीताई सावकारे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, उपसभापती वंदनाताई उन्हाळे, माजी सभापती व पं.स. सदस्य सुनील महाजन, माजी उपसभापती व पं.स. सदस्य मनीषा पाटील, कॉटन सेल संचालक प्रमोद भाऊ सावकारे, बोदवड कृउबा समिती सभापती निवृत्ती पाटील, कृउबा समिती संचालक प्रशांत पाटील, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नारायण कोळी, अतुल झांबरे, स्वप्नील पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुमीत बऱ्हाटे, भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील, हिमांशू दुसाने, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस महेश सोनावणे, कौस्तुभ पाटील, माजी जिप सदस्य समाधान पवार, माजी जिप सदस्य विश्वनाथ पाटील,सरपंच रामलाल बडगुजर, उपसरपंच वासुदेव वराडे, ग्राप सदस्य धोंडू गांधेले, ग्राप सदस्य सुनंदाताई बारी, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, माजी सरचिटणीस किरण कळसकर, गोपाळ बरकले, समाधान वराडे, उत्तम बारी, नाना गांधेले यांच्यासह महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound