पाचोरा, प्रतिनिधी । कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने येथील जितेंद्र जैन यांच्या समभाव प्रतिष्ठानतर्फे श्री कृष्ण जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत ‘अ’ गटातून आशी अनुप अग्रवाल तर ‘ब’ गटात उन्नती नितीन पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
कृष्णा चित्रकला स्पर्धेत ‘अ’व ‘ब’ दोन गटात स्पर्धेची विभागणी करण्यात आलेली होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाशिक्षक रोहित परदेशी व त्यांच्या टीमने काम पाहिले. या स्पर्धेत गट – ‘अ’ न प्रथम क्रमांक – आशी अनुप अग्रवाल, द्वितीय क्रमांक – रिनाज राजू पटेल, तृतीय क्रमांक – तनुज देवेंद्र वाणी, गट- ‘ब’धुन प्रथम क्रमांक – उन्नती नितीन पाटील, द्वितीय क्रमांक – मानसी नितीन पाटील तर तृतीय क्रमांक – समृद्धी तुषार जळतकर यांनी पटकावला आहे. विजेत्या स्पर्धकांचे तसेच आयोजक जितेंद्र जैन यांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. स्पर्धेतील विजेत्यांना लवकरच बक्षीस व सन्मानपत्राने सन्मानित केले जाणार आहे. तसेच या उल्लेखनीय स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ म्हणून प्रमाणपत्र वितरित केले जाणार असल्याचे जितेंद्र जैन यांनी सांगितले आहे.