Home Cities चोपडा चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस

चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस

0
133


chopda 1

चोपडा प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे.तालुक्यातील चुंचाळे, लासुर, वडती या गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. दरम्यान हा अवकाळी पाऊस असल्याने उभी असलेल्या पिकांसाठी संकट असल्याने दिसून येते. या पावसामुळे अद्याप कोणतेही नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वडती येथे साधारण 20 ते 25 मिनीटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

 

वराड गावात वादळी वारा मुळे घराचे पत्रे उडाले.  तसेच लासूर येथे जोरदार पाऊस झाला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound