कोल्हापूर विवेकानंद महाविद्यालय अभ्यासक्रमात डॉ. मिलिंद बागूल यांची कविता

जळगाव, प्रतिनिधी ।  आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद विनायक बागूल  यांच्या ‘संदर्भ माझ्या जातीचे’ ह्या कवितासंग्रहतील ‘बाबासाहेब आणि आम्ही’  शीर्षकाची कविता कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्वायत्त असणाऱ्या विवेकानंद महाविद्यालयांच्या बी. ए.भाग १  अभ्यासक्रमात  शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून समाविष्ट करण्यात आलेली आहे. 

 

डॉ. मिलिंद बागूल  यांचा ‘संदर्भ माझ्या जातीचे’ हा कवितासंग्रह हा कर्नाटकच्या धारवाड विद्यापीठात मराठी विभागाच्या बी. ए. बी.कॉम. बी.बी. ए.वर्गाच्या तिसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमात सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तक म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. कवितासंग्रहातील ‘समता’ ही कविता नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात बी.ए. प्रथम वर्षाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. ए. भाग दोनच्या अभ्यासक्रमात या अगोदर कवितासंग्रह समाविष्ट होता.  त्यांची शंकरराव खरात कथात्म वाङ्‍‍मय संपादित फ. मुं.  गजबजलेलं गाव, हमालपुरा ते कुलगुरू ही पुस्तके प्रकाशित झाली असून संदर्भ माझ्या जातीचे ह्या कवितासंग्रह डॉ. के. के.अहिरे यांनी संपादित केलेले  ‘संदर्भ माझ्या जातीचे आंबेडकरी जाणिवांच्या कवि’ता हे पुस्तक २०१६ ला प्रकाशित झाले आहे.

 

Protected Content