यावल : प्रतिनीधी । आदीवासी टोकरे कोळी समाजाला खावटी कर्ज योजनेच्या लाभापासुन का वंचित ठेवले याचा जाब विचारण्यासाठी यावल येथील आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आदोलन करुन संघर्ष समीतीकडून मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावल येथील जिनिंग प्रेसच्या सभागृहात टोकरे कोळी जमातीची बैठक अँड गणेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली व जिनिंग प्रेस सभागृहापासून प्रकल्प कार्यालयापर्यंत घोषणा देत धरणे आदोलन करीत विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत खावटी कर्ज योजनेचा लाभ देण्यात येतो टोकरे कोळी समाजातील लाभार्थाची प्रकरणे नाशिक येथील आयुक्त कार्यालयाच्या सुचनानुसार प्रबलित ठेवण्यात आले आहेत वंचित ठेवण्यात आलेल्या या लाभार्थ्यांना खावटी योजनाअंतर्गत दोन हजार रुपये व कीराणा कीट वाटप करावे , शासनाने अटी न लावता नव्याने वंचित लाभार्थ्यांची नावे सामाविष्ट करुन सर्वांना लाभ मिळावा अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती
यावेळी यावल तालुक्याचे टोकरे कोळी समाजाचे नेते संदिप सोनवणे , राहुल तायडे (बामणोद सरपंच), प्रमोद कोळी
( यावल ) ,गोकुळ कोळी (मनवेल) ,खेमंचद कोळी (सरपंच पाडळसा ) , समाधान मोरे , अरविंद सावळे , योगेश बाविस्कर , मोहन कोळी ( सरपंच पींप्री) , समाधान सोनवणे ( थोरगव्हाण) ,संदिप सोनवणे (रीधुरी) , भरत कोळी (यावल ), कैलास सोळंखे (शिरागड ), अनिल कोळी (साकळी) , योगेश कोळी (अट्रावल) ,गजानन कोळी (पीप्री ) यांच्यासह तालुक्यातील समाज बाधव उपस्थित होते.