गोदावरी नर्सिंग कॉलेज येथे अवयव दिनानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी नर्सिंग कॉलेज येथे ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान अवयव दिनानिमित्त महाविद्यालयीन स्तरावर मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागाद्वारे तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यामध्ये विविध उपक्रम, जनजागृती अवयव दानाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी उपक्रम सादर केले. त्यामध्ये विविध स्पर्धा तसेच रांगोळी, पोस्टर, वक्तृत्व, निबंध, कविता सादरीकरण तसेच पथनाट्य ते इत्यादी उपक्रमांद्वारे समाजांमध्ये अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला आहे.

रेड क्रॉस सोसायटी इथून प्रमुख अतिथी म्हणून उज्वला वर्मा यांना आमंत्रित करण्यात आले. तर प्रमुख उपस्थितींना प्रोत्साहस्पद विद्यार्थ्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगितले व विद्यार्थ्यांमध्ये केवळ उत्साहा स्फूर्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मौसमी लोंढे यांनी वैद्यकीयदृष्ट्या त्यांचे महत्त्व पटवून दिले व त्यापासून कशा प्रकारे एखाद्या गरजूंना जीवनदान दिले जाऊ शकते व त्याचे त्यांच्यापासून महापुण्य घडू शकते हे पटवून दिले. तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व प्राचार्य यांनी सुद्धा प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य बेसिक बीएससी नर्सिंग चतुर्थ वर्गांमध्ये शिकत असलेला विद्यार्थिनींनी सक्रीय सहभाग घेतला. तसेच मेडिकल सर्जिकल डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांनी कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे शासनाचे विशेष सहकार्य लाभले व इतर शिक्षक वृंद यांचे देखील सहकार्य लाभले आहे.

 

Protected Content