जळगाव प्रतिनिधी । शहरात बर्याच ठिकाणी वृक्ष लावली जातात मात्र याचे संगोपन होत नाही. या पार्श्वभूमीवर जे कुणी वृक्ष वाढविण्याची हमी देतील त्यांनाच महापालिकेतर्फे रोप दिले जातील अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली. शहरातील गजानन कॉलनी परिसरात आज मान्यवरांच्याहस्त वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. शांताराम सोनवणे, नगरसेवक आश्वीन सोनवणे, उपायुक्त श्याम गोसावी, प्रशांत पाटील, डॉ. पराग चौधरी, डॉ. संजय पाटील, डॉ. पराग चौधरी, डॉ. जयश्री चौधरी, माजी महापौर सिमा भोळे, नगरसेविका दिपमाला काळे, पिन्टू काळे, ओक बाबा, सुधाकर पाटील, राजेश जैन, लक्ष्मण पोळ, रविंद्र मनोरे यांच्यासह महापालिकेचे आरोग्य व बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.