नाल्यावरील पुल सुरू; मात्र बस प्रवाशांचा फेरा कायम

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ममुराबाद रस्त्यावर लेंडी नाल्यावरील पुल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी नागरिकांचा त्रास कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लेंडी नाल्यावरील पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. आज सकाळपासून हा पुल रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे हजारो नागरिकांना पडणारा फेरा वाचणार आहे. तथापि, हा पूल रहदारीसाठी खुला झाला तरी येथून बस जाणार नसल्यामुळे नागरिकांचा त्रास कायम राहणार आहे.

या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते तथा शिवाजीनगर पुल संघर्ष समितीचे पदाधिकारी दीपककुमार गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, रेल्वे प्रशासनाने हा पुल पूर्णपणे दुरूस्त करून आधीसारखी वाहतूक व्हावी यासाठी बराच वेळ लावला. निर्धारीत नियोजनानुसार यासाठी ४५ दिवस लागणार होते. मात्र याला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला. तथापि, खूप विलंब लाऊनदेखील जर येथून बस अथवा अन्य मोठी वाहने जात नसतील तर याचा काहीही फायदा होणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. विशेष करून बसने जाणार्‍या प्रवाशांना आधीप्रमाणेच फेरा पडणार असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने अपेक्षाभंग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Add Comment

Protected Content