राज्य सरकार मदत पुरविण्यात अपयशी : आ. गिरीश महाजन ( व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | कोकणातील आपत्तीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रशासनाच्या आधी मदत पोहचवली असली तरी यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला. राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पूरग्रस्तांना मदतीचा ट्रक रवाना करण्याप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे कोकणात पाठविण्यात येणार्‍या ट्रकला हिरवा झेंडा दाखविला. यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, कोकणात सध्या अतिशय भयावह परिस्थिती आहे. मी स्वत: गाडी चालवून महाड येथे पोहचलो. मात्र तेथे प्रशासन पोहचले नव्हते. अगदी साधा तलाठी देखील २२ तासापर्यंत तिथे पोहचला नव्हता असे आ. महाजन म्हणाले.

आ. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, कोकण आणि पश्‍चीम महाराष्ट्रात अतिशय भयावह अवस्था असतांना पूरग्रस्तांना तात्काळ मदत नाकारण्यात आली. यासाठी पंचनाम्यांसारखे कारण देण्यात आले. तात्काळ मदत नाकारणे ही खरी शोकांतिका असून राज्य सरकार मदत करण्यात साफ अपयशी ठरल्याचे आ. गिरीश महाजन म्हणाले.

खालील व्हिडीओत पहा आमदार महाजन नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/884203322305829/

 

Protected Content