वंचित आघाडीच्या बैठकीत समीक्षा , संवाद (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  । वंचित बहुजन आघाडीच्या  महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन  महिला प्रदेश अध्यक्षा रेखा  ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात  आले होते . याबैठकीत शहर , तालुका व जिल्हा पदाधिकारी यांच्या कामांची  समीक्षा करून त्यांच्याशी पुढच्या नियोजनाबद्दल  संवाद साधण्यात आला. 

 

या बैठकीत बहुजन आघाडी महिला प्रदेश अध्यक्षा रेखा  ठाकूर, प्रदेश उपाध्यक्षा   सविता  मुंढे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी ,   प्रदेश सचिव डॉ  अरुंधती शिरसाठ आदींची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी पत्रकारांशी बोलतांना  रेखा ठाकूर यांनी सांगितले की,  आगामी निवडणुका लक्षात घेता बुथ बांधणीला प्राधान्य देण्यात आले आहे.  जिल्हा, तालुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्राम शाखा व बूथ शाखा या सर्व स्तरांवर कार्यकर्त्यांची बांधणी करण्यात येत आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत थेट पोहचत येत असते. वंचितांचे राजकारण करतांना पैशाचा वापर होवू शकत नाही. वंचित जनता हीच आमची ताकद आहे. या सर्व जनतेला संघटनेच्या माध्यमातून बांधून घेणे हे यामागील मुख्य सूत्र आहे. वंचित बहुजन आघाडीचा स्वबळावर लढण्याचा निर्णय  आहे. सर्व ठिकाणी आम्ही स्वबळावर लढणार आहोत. स्थानिक पातळीवर चांगले काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांसोबत आम्ही जावू शकतो. परंतु, प्रस्थापित पक्षांसोबत आम्ही जाणार नाही. लोकांच्या बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.  कार्यकर्त्यांनी जनतेत गेले पाहिजे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, जनतेसाठी मदतीचे काम केले पाहिजे , संघटना बांधणीचे काम करून आपली ताकद निर्माण केली पाहिजे. याप्रसंगी  जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, मिलिंद सोनावणे, नरेश पाटील, दिनेश शिंपी, दादा राठोड  आदी उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/867646713887871

 

Protected Content