बुलढाणा , प्रतिनिधी । प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ११८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २ हजार ६३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
तालुकानिहाय आजची आकडेवारी
बुलडाणा शहर : १ , बुलडाणा तालुका : भडगाव १, मलकापूर तालुका : वाकोडी १, सिं. राजा तालुका : किनगांव राजा २, कुंबेफळ १, संग्रामपूर तालुका : बोरखेड १, दे. राजा शहर : २, दे. राजा तालुका : नारायणखेड १, पांगरी १, पिंपळगांव चि ४, जांभोरा २, खामगाव शहर : ८, खामगाव तालुका : गोंधनापूर १, चिखली शहर : ३, चिखली तालुका : अंबाशी १, रस्तळ १, इसोली १, सातगाव भुसारी १, शेगाव शहर : ३, शेगाव तालुका : मनसगाव ३, गोळेगाव १, जानोरी १, पलोदी १, भोनगाव १, पळशी १, मेहकर तालुका : खामखेड १, जळगाव जामोद शहर : १, जळगाव जामोद तालुका : सुनगाव १ , लोणार शहर : २, लोणार तालुका : येवती १, आरडव १, परजिल्हा चिंचबा ता. रिसोड १, जाफ्राबाद २, नागड ता. बाळापूर १ संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.
अशाप्रकारे जिल्ह्यात ५५ रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मोताळा येथील ७० वर्षीय महिला, केसापूर ता. बुलडाणा येथील ४५ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज १०६ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६ हजार ८ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८५ हजार १०२ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात २५७ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६४९ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.