Home Agri Trends चाळीसगाव येथे कुस्त्यांची दंगल उत्साहात ( व्हिडीओ )

चाळीसगाव येथे कुस्त्यांची दंगल उत्साहात ( व्हिडीओ )


chalisgaon kusti

चाळीसगाव प्रतिनिधी । रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळ व कोंडाजी वस्ताद व्यायाम शाळा आयोजित कुस्त्यांची दंगल कुस्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चाळीसगाव शहरात गेल्या 85 वर्षांपासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कुस्त्यांची दंगल भरवली जाते. या कुस्त्यांमध्ये भाग घेण्यासाठी राज्यासह देशाच्या इतर भागातून पैलवानांचा समावेश होतो.

आज झालेल्या कुस्त्यांची स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी या स्पर्धेत विविध भागातून आलेल्या मल्लांनी त्यात भाग घेऊन आपल्या डाव दाखवत बक्षिसे पटकावली. सीताबाई मांगीलाल अग्रवाल ट्रस्टचे अग्रवाल कुटुंबीय यांच्या दातृत्वातून या कुस्त्या दरवर्षी पार पडतात. आजच्या कुस्त्यांना हजारो कुस्तीप्रेमी नागरिकांनी हजेरी लावून कुस्ती खेळाचा आनंद घेतला.

पहा । आखाड्यात कुस्तीचे डाव लावतांना मान्यवर


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound