काँग्रेस आघाडी उभारणार विजयाची गुढी – डॉ. उल्हास पाटील


pahur prachar

पहूर, ता. जामनेर (वार्ताहर)। येत्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी प्रचंड मताधिक्य मिळवून विजयाची गुढी उभारेल, असा विश्वास उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी पहूर येथील प्रचार रॅली प्रसंगी व्यक्त केला. 23 एप्रील रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले असून प्रचारास वेग येत आहे. शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली .पहूर पेठ येथील राममंदीरापासून रॅलीस प्रारंभ झाला. गावातील प्रमुख मार्गावरून रॅलीचे आयोजन करण्यात आले .पहूर पेठ, पहूर कसबे भागात नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरूड, किशोर पाटील, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, उपसरपंच योगेश भडांगे , ग्राम पंचायत सदस्य विवेक जाधव, इका पहेलवान, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष राजू जेन्टलमन, विनोद क्षीरसागर, योगेश बनकर, भुषण लहासे, रवी जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here