जळगाव, प्रतिनिधी । समाजाचे प्रबोधन आणि मनोरंजन करणारे किर्तनकार आणि कलावंतांवर सध्या अतिशय भयंकर वेळ आलेली आहे. त्यांच्या मदत करण्याची वेळ यावी हे अतिशय दुर्दैवी असले तरी आज त्यांना याचीच गरज आहे. यामुळे आपण त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तर बदलत्या काळाशी जुळवून घेत या मंडळीने आता उपजिविकेसाठी पर्यायी व्यवस्थांचा विचार करावा असा सल्ला आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू कलावंतांना जीवनावश्यक किटचे वाटप आणि किर्तनकारांतर्फे त्यांच्या सन्मानाच्या छोटेखानी कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यंदा कोविडच्या प्रकोपामुळे आपला वाढदिवस साजरा केल नाही. वाढदिवसाच्या दिवशी ते जिल्ह्यात नव्हते. त्यांनी फक्त सोशल मीडियातून शुभेच्छा स्वीकारल्या. दरम्यान, आज पालकमंत्री जिल्ह्यात आल्यानंतर ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर व सहकारी किर्तनकार व कलावंतांनी संयुक्तपणे त्यांचा छोटेखानी सत्कार केला. याच कार्यक्रमात 100 च्या वर गरजू कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंच्या सामानांचे वाटप करण्यात आले. यावेळी जळगाव शहरात लवकरच लोककलवंता साठी लोककला भवन निर्माण करून त्या द्वारे खान्देशातील लोककलांच जतन संवर्धन करण्याबरोबर लोककलेच आध्यासन केन्द्र उभारण्यात येईल.. या कलाभवनाच्या माध्यमातुन जिल्यातील लोककलावंताची सूची निर्माण करून त्यांना शासणाच्या विविध योजना चा लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे जाहीर केले… या प्रसंगी खान्देश लोककलावंत विकास परिषदचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा ज्येष्ठ कलावंत मानधन निवड समितीने यंदा खर्याखुर्या गरज असणार्या कलावंतांना या माध्यमातून 200 पात्र व गरजू कलावंतांना शासकीय मदत मिळवून दिली आहे. शासनाच्या नियमानुसार यंदा एका वर्षाला शंभर कलावंतांनाच मदत करता आली असली तरी याची मर्यादा वाढवून दोनशे करण्यात यावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. आज कोरोनामुळे किर्तनकार आणि कलावंतांवर अतिशय वाईट स्थिती उदभवली आहे. आम्ही आधी देखील त्यांच्यासाठी मदत केली असून आजही त्यांना मदत करत आहोत. मात्र आता फक्त कलेवर आपली उपजिविका चालेल की नाही याचा वास्तववादी विचार करून किर्तनकार आणि कलावंतांनी पर्यायी मार्ग शोधावेत असा प्रॅक्टीकल सल्ला पालकमंत्र्यांनी दिला. तर, पदे येतात आणि जातात मात्र केलेली मदत हीच लक्षात राहत असते. लोक हीच आमची शक्ती असून “ग” ची बाधा झाल्यास ही शक्ती नष्ट होत असते. यामुळे आपल्याला गर्वाची बाधा होता कामा नये असेही पालकमंत्री म्हणाले.
खान्देश लोककलावंत विकास परिषद च्या वतीने आयोजित या कार्यक्रमास ना पालक मंत्री गुलाबरावजी पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने कलेच आराद्य दैवत नटराज कास्य शिल्प प्रदान खान्देश लोककलावंत विकास परिषद चे अध्यक्ष विनोद ढगे शाहीर शिवाजीराव पाटील, गोंधळ सम्राट प्रकाश वाघ वहीगायक गणेश अमृतकर यांच्या करण्यात येईल…यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात कलावंतांतर्फे कोरोनामुक्त गाव या संकल्पनेवर आधारित गावोगावी जागर करण्यात येणार असून आज पालकमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ कलावंत व वृध्द कलावंत मानधन निवड समितीचे सदस्य विनोद ढगे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्यामुळे अनेक कलावंतांना अगदी घरी जाऊन शासकीय वेतनाचा लाभ मिळवून दिल्याचे नमूद केले. तर याच कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंत निवड समितीचे अध्यक्ष गजानन महाराज वरसाडेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी माऊलींचा गजराने परिसर दुमदुमून गेला. तर कलावंतांनी नटराजाची मूर्ती देऊन पालकमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले.
या कार्यक्रमाला महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, निवड समितीचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर, भाऊराव महाराज पाटील सर, ज्ञानेश्वर महाराज, शाहीर शिवाजी पाटील, सी एस पाटील सर, सूर्यभान महाराज, नगरसेवक गणेश सोनवणे, राज राठोड यांच्यासह जिल्ह्यातील कलावंत व वारकरी संप्रदायाचे मान्यवर व शाहीर गोंधळी, वाघ्या मुरळी ,पोतराज, वहीगायण, करपावली, तुतारी वादक, टिगंरी वादक… आदि कलाप्रकारातील लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/214821806986770