‘तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं असं नाही’ – उद्धव ठाकरे

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या “शिवसेनेने हिदुत्व सोडलं” या विधानाला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज ऑनलाईन सभा घेतली. यावेळी ‘तुम्ही म्हणजेच हिदुत्व असं नाही. आम्ही तुम्हाला सोडलंय हिंदुत्वाला नाही. अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.

यावेळी बोलतांना त्यांनी सर्वप्रथम सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्यात. कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर “राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाहीए, पण कुस्तीमध्ये जर भाजपा उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. अशी टीका त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले की,  “जे आता बेंबीच्या देठापासून ओरडताय की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे काय हिंदुत्व नाही सोडलं. तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही

Protected Content