Home Cities जळगाव महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून खान्देश प्रेरणा पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून खान्देश प्रेरणा पुरस्काराचे वितरण

0
105


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत भवन येथे आज श्री राम नवमी निमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने खान्देश प्रेरणा पुरस्कार महापौर जयश्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

 

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून सामाजिक बांधिलकी जपत खानदेश प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात दिनेश बडगुजर , संघपाल तायडे, राजश्री नेवे यामिनी नरेंद्र लोहार, मनीषा पाटील, आबा मकासरे , सुमित पाटील, शब्बीर सय्यद, अश्विन पाटील ,कुणाल पवार त्यानंतर सामाजिक कार्य, पत्रकारिता,क्रीडा, सारे क्षेत्रातील असे एकूण साठ पुरस्कार देण्यात आले. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महापौर जयश्री महाजन, मनोज आत्माराम पाटील ,प्रतीक्षा पाटील, भारती काळे, अनिल भाऊराव पाटील, जी, टी,महाजन, दिनेश प्यार पाणी, वासुदेव पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास अध्यक्ष कुणाल मोरे, राहुल सूर्यवंशी राहुल कांबळे, चेतन निंबाळकर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, व प्रतिभा मेटकर मॅडम व अमित माळी यांनी सूत्रसंचालन केले.


Protected Content

Play sound