दोन गटात हाणामारी, दगडफेक; आगही लावण्यात येऊन वाहनांची तोडफोड

साबरकांठा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | गुजरात राज्यातील साबरकांठा या ठेकाणी रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली असून हाणामारीत आगही लावण्यात येऊन पोलीसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी केला आश्रु धुराचा वापर केला आहे..

रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने यात  अनेक वाहनांचेही नुकसान झाले असल्याचं वृत्त आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी अश्रुधुराच्या ५ नळकांड्या फोडल्या आहेत.

दोन गटांमध्ये झालेल्या या हाणामारीत आगही लावण्यात आली असून या आगीत एक जीपसह दुचाकीचं नुकसान झालं असल्याची माहिती सोर येत आहे. या दगडफेकीत पोलीसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. मात्र पोलीसांनी ‘हिमतनगर चपरिया’ या परिसरात मिरवणुकीत सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Protected Content