Home Cities जामनेर भाजयुमोची जामनेर तालुका कार्यकारिणी जाहीर

भाजयुमोची जामनेर तालुका कार्यकारिणी जाहीर

0
74

जामनेर प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चाची जामनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात तालुक्यातील सक्रीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजयुमोची तालुका कार्यकारिणी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील व शहराध्यक्ष अतिष झाल्टे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी भारतीय जनात युवा मोर्चाचे अध्यक्ष नीलेश पवार, मयूर पाटील व सुभाष पवार यांच्यासह उपाध्यक्षपदी अर्जुन मगर (मिराचे पळासखेडा), वैभव राजपूत (भारुडखेडा), संभाजी पाटील (जळांद्री), महेंद्र पाटील (नाचणखेडा), विशाल धांडे (फत्तेपूर), नीलेश थोरात (शेंदुर्णी), दिनेश भागवत (लोंढरी), गोपाल कदम (बेटावद), विजय शिरसाठ (जामनेर), झिशान पटेल (तोंडापूर), चिटणीस कमलेश शिंदे (देवपिंप्री), कल्पेश कोटेचा (तोंडापूर), चेतन रोकडे (पहूर), रोहित जाधव (देवळसगाव), मनोज जाधव (हरीनगर), जोगेश्‍वर अग्रवाल (शेंदुर्णी), सिकंदर तडवी (पाळधी), मेघराज नाईक (खडकी), भूषण पाटील (सवतखेडा), अ‍ॅड. सचिन पाटील, राहुल शिंगारे, कोषाध्यक्षपदी विकास वंजारी, प्रसिद्धी प्रमुख वैभव नाईक यांची निवड झाली.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवनियुक्त कार्यकारिणीचे माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound