भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जाम मोहल्ला येथे लहान मुलांचा क्रिकेट खेळतांना चेंडू दुकानात गेल्याच्या कारणावरून दुकानदाराने तरूणाला मारहाण करून दुकानाचे लोखंडी कुलूप मारून जखमी केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जखमी तरूणाच्या फिर्यादीवरून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील जाम मोहल्ला भागा असलेल्या एमएम फुटवेअरच्या दुकानासमोर काही लाहन मुले १७ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान क्रिकेट खेळ होते. दरम्यान लहान मुलांचा बॉल हा एमएम फुटवेअर दुकानात गेला त्यावेळी अरबाज शेख बिलाल (वय-२२) रा. जाम मोहल्ला हा बॉल घेण्यासाठी दुकानात गेला असता दुकान मालक अक्रम, रफिक, अनवर, अली (पुर्ण नाव माहित) नाही यांनी अरबाज शेख याला शिवीगाळ व मारहाण केली. यातील अक्रमने दुकानाचे लोखंडी कूलूप अरबाजच्या डोक्यात मारले. यात अजबाजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अरबाजच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयेंद्र पगारे करीत आहे.