भुसावळ, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोना महामारी लक्षात घेत शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक दायित्व जोपासत ग्रामिण रुग्णालयात माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटाईजर, मास्क व फळांचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर चौधरी, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, उपाध्यक्ष बिसन गोहर, अजय नागराणी,युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, नंदकिशोर बडगुजर, अमित आसोदेकर, प्रशांत भट यांची उपस्थिती होती.