Home राष्ट्रीय फेसबुकवर भेटलेल्या मित्राकडून घात ; महिलेवर २५ जणांचा बलात्कार

फेसबुकवर भेटलेल्या मित्राकडून घात ; महिलेवर २५ जणांचा बलात्कार


नवी दिल्ली : वृत्तसंस्था । फेसबुकवर मैत्री झालेल्या तरुणाने लग्नाची मागणी घातली. वडिलांशी भेट घालून देतो म्हणून जंगलात घेऊन गेला. नंतर त्या महिलेवर २५ जणांनी  बलात्कार केल्याची धक्कादायक घडली आहे. ३ मे रोजी ही घटना घडली. ९ मे रोजी महिलेनं पोलिसांत धाव घेतली. नंतर हा प्रकार समोर आला.

 

पीडित महिला दिल्लीमध्ये घरगुती काम करते. चार वर्षापूर्वी ती दिल्लीत आली आणि दिल्लीतच राहायची. महिलेची सागर नावाच्या तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली. जानेवारी महिन्यात दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले.

काही काळ गेल्यानंतर आरोपी सागरने महिलेला लग्नाची मागणी घातली. त्याचबरोबर आपल्या वडिलांनाही भेटवतो, असं त्या महिलेला आरोपी म्हणाला. त्यानंतर होडल येथे आल्यास वडिलांची भेट होऊन शकते असं म्हणत २३ वर्षीय सागरने महिलेला यायला सांगितलं.

 ३ मे रोजी महिला प्रवास करून होडल येथे पोहोचली. तिथे ती आरोपी सागरला भेटली. त्यानंतर आरोपी महिलेला घेऊन रामगढमधील जंगलात घेऊन गेला. तिथे सागरचा भाऊ आणि त्यांच्या मित्रांचा ग्रुप  होता. ते सगळे जंगलात दारू पित बसले होते.

महिला तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी अत्याचार केला.  दुसऱ्या दिवशी आकाश नावाच्या भंगार विक्रेत्याकडे महिलेला घेऊन गेले. त्या ठिकाणी महिलेवर पाच जणांनी बलात्कार केला. वारंवार बलात्कार करण्यात आल्याने महिलेची प्रकृती बिघडली. त्यामुळे आरोपींनी बर्दापूर सीमेवर महिलेला फेकून दिलं आणि फरार झाले.

या सगळ्या भयंकर घटनेनंतर १२ मे रोजी महिला हसनपूर पोलीस ठाण्यात गेली. महिलेनं आरोपीविरुद्ध तक्रार दिली. प्रकृती बिघडल्याने तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचं महिलेनं पोलिसांना सांगितलं.  पोलिसांनी आरोपी सागरला शुक्रवारी अटक केली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे


Protected Content

Play sound