सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ

 

 

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था । काही दिवसांमध्ये म्हणजे 11 महिन्यांमध्ये सोयाबीनचं तेल तब्बल 72 टक्के महागलं आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार सोयाबीन तेल आणखी महागू शकतं. या सर्वाचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होऊ शकतो.

 

भारत सध्या कोरोना विषाणूी संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. काही राज्यांनी कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे.   निर्बंध कायम राहिल्यास मागणी पुरवठा साखळीवर परिणाम होईल. यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. परिणामी महागाईच्या झळा बसू शकतात. भारतातील वायदेबाझार नॅशनल कमोडिटी अँड डेरीवेटिव्स एक्सचेंजनं देशात महागाई वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

 

सोयाबीनचा भाव मागील वर्षाच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे. देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एका क्विंटलला 4500 ते 7000 रुपये या दरम्यान दर मिळाला आहे. काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यापेक्षा कमी किमतीला देखील सोयाबीन विकल्याचं दिसून येतं.

 

सोयाबीन तेलाचे दर वाढण्यामागे लोकांकडून  अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवणं ही बाब कारणीभूत आहे. कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्यानं लॉकडाऊनच्या भीतीनं लोक अतिरिक्त साठा करुन ठेवत आहेत. मागणी वाढल्यानं पुरवठ्यावर ताण येऊन किमती वाढत असल्याचं निरीक्षण काही तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

 

भारतीय संशोधकांनी सोयाबीनचं नवं वाण तयार केलं आहे. या वाणाचा नाव MACS 1407 हे आहे. पुणे येथील संशोधन संस्थेने सोयाबीनच वाण तयार केलं आहे. या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल सोयाबीनंचं उत्पादन होऊ शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना एमएसीएस 1407 वाणाचं बियाणं पुढील हंगामापासून उपलब्ध होणार आहे.

 

Protected Content