Home क्राईम पारोळा येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलीसात गुन्हा

पारोळा येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलीसात गुन्हा


पारोळा प्रतिनिधी । शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, स्टेट बँक ऑफ इंडिया इमारतीच्या आवारात असलेल्या एटीएम या ठिकाणी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीनचा लॉक व दरवाजा तोडून मशीन मधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्याने बँकेचे कर्मचारी किरण कुमार बिडकर (वय 41) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याने पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विनोद साळी करीत आहे.

 


Protected Content

Play sound